Ad will apear here
Next
चक्रीवादळामुळे हानी झालेल्या सह्याद्रीच्या कुशीतील गावांना मदतीसाठी मोहीम


नुकत्याच येऊन गेलेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळामुळे सह्याद्री पर्वताच्या कुशीतील, विशेषतः रायगड आणि पुणे जिल्ह्यातील, अनेक लहान गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये खूप हानी झाली आहे. उधेवाडी (राजमाची), एकोले, भांबुर्डे (घनगड), ठाकूरवाडी (प्रबळ माची), किल्ल्याची वाडी (माणिकगड) ही त्यातील काही गावे. अशा गावांना मदत करण्यासाठी महा-अॅडव्हेंचर कौन्सिलने (मॅक) एक मोहीम सुरू केली आहे. पर्यावरण आणि सहभागी व्यक्तींच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन, गिर्यारोहण व अन्य साहरी क्रीडाप्रकारांचे उत्कृष्ट आयोजन करण्याच्या दृष्टीने संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी महा-अॅडव्हेंचर कौन्सिलची स्थापना गेल्या वर्षी झाली आहे.

‘सह्याद्रीत, तिथल्या किल्ल्यांवर वर्षानुवर्षे आपण केलेल्या भटकंतीत, निरनिराळ्या साहसात आपल्याला मदतीला धावून येणाऱ्या या लोकांना आज आपली मदत हवी आहे,’ असे आवाहन महा-अॅडव्हेंचर कौन्सिलने गिर्यारोहकांना, तसेच अन्य नागरिकांना केले आहे. या अभियानांतर्गत वादळग्रस्त गावांतील लोकांना घरावरील पत्रे, घरबांधणी साहित्य अशा विविध स्वरूपात मदत केली जाणार असल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या मदत अभियानासाठी रोख किंवा वस्तू-रूपाने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत काही विधायक कल्पना-सूचना असल्यास त्याही कळवाव्यात असे सांगण्यात आले आहे.

ज्येष्ठ गिर्यारोहक राजेश गाडगीळ आणि दिलीप लागू या अभियानाचे नेतृत्व करत आहेत.

संपर्क :
राजेश गाडगीळ
ई-मेल : rajesh.gadgil1@gmail.com
मोबाइल : ९८२१० ९४७२५

दिलीप लागू
ई-मेल : dilip@lagubandhu.com
मोबाइल : ९८२०१ ११७४१

देणगीसाठी बँक खात्याचा तपशील :
खातेधारक : गिरिविहार
बँक : एचडीएफसी बँक
बचत खाते क्रमांक : ५०१००१९६४५०७१७
IFSC क्रमांक : HDFC०००००८४

(या खात्यात देणगी दिल्यास देणगीदाराला आयकराच्या 80G या कलमाखाली सूट मिळणार आहे.)

(महा-अॅडव्हेंचर कौन्सिल या संस्थेबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZDACN
Similar Posts
बालदिनी विशेष मुलांसाठी काँग्रेसतर्फे खास कार्यक्रम पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला
मराठी शुद्धलेखनाचे पहिले ॲप पुणे : भाषेची शुद्धता आणि नेमकेपणा हा विचार हळूहळू मागे पडत चाललेला असताना, ज्यांना खरोखरच शुद्ध भाषेत लिहायचे आहे, शब्दांचा वापर समजून-उमजून करायचा आहे, अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठी शुद्धलेखन या विषयात गेली अनेक वर्षे काम करणारे व्याकरणतज्ज्ञ अरुण फडके यांनी शुद्धलेखन या विषयावरील पहिले मोबाइल ॲप सादर केले आहे
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language